वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवला, अभिनेता रणवीरचा गौप्यस्फोट

2188

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याचे सितारे सध्या सातवे आसमानपर आहे. त्याचे चित्रपट एकामागोमाग हिट होत आहेत. चित्रपटांसह जाहिरात क्षेत्रातही त्याचा दबदबा दिसून येतो. बॉलिवूडमधील हा ‘सिक्का’ चांगलाच चालत असतानाच त्याने एक गौप्यस्फोट केला आहे. वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्याची कबुली ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत रणवीर सिंग याने केली.

मुलाखतीमध्ये रणवीर सिंगला कंडोमच्या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना तो म्हणाला की, ‘वयाच्या बाराव्या वर्षी मी केवळ उत्सुकतेपोटी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी शरीरसंबंध ठेवले होते. तसेच मी प्रत्येक गोष्ट खूप कमी वयात केली आहे. मी काळाच्या पुढे होतो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.’

तो पुढे म्हणाला की, ‘मी शाळेत असताना माझ्या मित्रांचे आईवडील मला म्हणायचे की, तू आमच्या मुलांना वाईट मार्गावर नेत आहेस. माझ्या वयाच्या मुलांना सेक्सविषयी फार काही माहीत नव्हते. त्यामुळे मी यात खूप एक्स्पर्ट झालो असे मला वाटायला लागलं होते.’


View this post on Instagram

About to embark on a remarkable cinematic journey #proud #blessed @kabirkhankk @83thefilm

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

म्हणून कंडोमची जाहिरात करतो
कंडोमची जाहिरात का करतो यामागील कारणही रणवीरने सांगितले आहे. एकदा कारमध्ये बसलेलो असताना होर्डिंगवरील विविध जाहिराती पाहत होतो. त्यावर विविध विक्रीच्या वस्तू दिसल्या पण कंडोमची जाहिरात कुठेच नव्हती. मग मला समजलं की आपल्याकडे कंडोमच्या ज्या जाहिराती आहेत त्या अत्यंत प्रक्षोभक आहेत. सेक्सची फक्त हीच एक संकल्पना होऊ शकत नाही. पण आता समाजाचा या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. त्यामुळे आता याविषयी मोकळेपणाने आपण बोलू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या