रणवीर आजारी तर नाही ना ?

16
रणवीर सिंह - यूएसच्या इंडियाना यूनिव्हर्सिटीमधून रणवीरने ग्रॅज्यूएशनची डिग्री घेतली आहे.

सामना ऑनलाईन । मुंबई

सिनेक्षेत्रात टिकायचे असेल तर प्रत्येक अभिनेता अभिनेत्रीला त्यांच्या चित्रपटाच्या भूमिकेप्रमाणे बदल करावा लागतो. बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आगामी चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतो आहे. नुकताच पद्मावत चित्रपटात अल्लाउद्दीन खिल्लजी या क्रूर खलनायकाची भूमिका साकारलेला अभिनेता ‘गली बॉय’ बनण्याच्या तयारीत आहे. नुकताच रणवीर सिंगने आपल्या ट्विटरवरून एक फोटो पोस्ट केला आहे. खिल्लजीच्या भूमिकेसाठी पिळदार शरीरयष्टी धारण केलेला रणवीर वेगळ्याच रूपात पाहायला मिळतो आहे. या फोटोला कॅप्शन देताना पद्मावत ते ‘गली बॉय’ असे त्याने लिहिले आहे.

रणवीर सिंगचा हा फोटो पाहून कदाचित त्याच्या चाहत्यांना तो आजारी पडला आहे असे वाटले. परंतु असे काहीही नसून त्याचा हा आगामी ‘गली बॉय’ या चित्रपटातील आहे. ‘गली बॉय’ या चित्रपटासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली असून त्यासाठी त्याने त्याचे बरेचसे वजनही घटवले आहे.

‘गली बॉय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर करणार आहे. रॅपर डिवाइन यांचा झोपडपट्टीत सुरू होऊन प्रसिद्ध ‘ रॅपर’ होण्यापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवला जाणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या