रावरंभा राजे निंबाळकर यांची 283वी पुण्यतिथी साजरी

889

इतिहासकालीन जहागीरदार राजे रावरंभा निंबाळकर यांची 283 वी पुण्यतिथी आज माढा नगर पंचायतच्या वतीने नगराध्यक्षा मीनल साठे यांनी अभिवादन करून साजरी केली.

या निमित्ताने नवीन पिढीसाठी त्यांनी केलेला नगर येथे औरंगजेब याच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात धनाजी जाधव बरोबर होते. हा त्यांचा ऐतिहासिक पराक्रम समोर आला तसेच माढा शहराची ऐतिहासिक ओळखही समोर आली. प्रा. सतीश कदम यांच्या ऐतिहासिक संशोधना नंतर पेशवे कालीन दप्तरात रावरंभा निंबाळकर यांच्या मृत्युविषयी माहिती मिळाली कार्तिक वद्य 11 गुरुवार, 17 नोव्हेंबर 1736 अशी माहिती सापडल्याने व त्यांची समाधी स्थळ माढा येथे असल्याने तिथीनुसार त्यांच्या पुण्यतिथी येत असल्याने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. यावेळी नगर पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ चरण कोल्हे, माजी नगराध्यक्ष अनिता सातपुते, राहूल लंकेश्वर, गंगाराम पवार,आदी मान्यवर उपस्थित होते.

ऐतिहासिक पार्श्वभूमी
रंभाजी बाजी उर्फ पहिला रावरंभा हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कन्या सखुबाई आणि फलटणचे महादजी नाईक निंबाळकर यांचे नातू. रावरंभा निंबाळकर या सरदारांचा कार्यकाल मोठा असून इतिहासकालीन घटनेत मोठा वाटा आहे. 1707 ते 1942 या 223 वर्षे त्यांची जहागिरी होती. ती त्यांना निजामाकडून मिळाली होती. त्यात माढा (इतिहास कालीन माढे), तुळजापूर, करमाळा, रोपळे, नळदुर्ग, राजूरी (उदगीर),शेंद्री, भूम ,या गावाचा समावेश होता. रावरंभा निंबाळकर घराण्यातील 7 वारसदारांनी ही जहागिरी सांभाळली. या गावात अजूनही वास्तू आपल्या इतिहासाची साक्ष देतात माढा शहरातील, त्यांनी बांधलेला किल्ला (गढी), तसेच माढेश्वरीचे मंदिर त्यांच्या कार्याची आजही साक्ष देतात. त्यांचे वंशज रोपळे (ता माढा) आणि शेंद्री (ता बार्शी) या ठिकाणी आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या