संतापजनक! २२ वर्षीय तरुणाचा ७७ वर्षीय महिलेवर बलात्कार

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हैदराबादमध्ये मैलारदेवपल्ली येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ७७ वर्षीय वृद्ध महिलेवर घरात घुसून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. २२ वर्षीय युवकाने या महिलेवर बलात्कार केला आहे. बलात्कानंतर त्याने महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. पी वाम्शी असं आरोपी युवकाचं नाव असून तो मजूर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाम्शीने घरात घुसून या महिलेवर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर त्याने महिलेवर काठीने आणि कुऱ्हाडीने डोक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेचा नातू ज्यावेळी घरी आला तेव्हा त्याने लोकांच्या मदतीने महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.