आग व पेट्रोल एकत्र ठेवल्यास भडका उडणारच, मुस्लिम धर्मगुरूने सांगितलं बलात्काराचं संतापजनक कारण

वाढत्या बलात्काराच्या घटनांना मुलं-मुलींचे एकत्र शिक्षण जबाबदार आहे. कॉलेजमध्ये मुलं आणि मुली एकत्र शिकतात. जर आग आणि पेट्रोल एकत्र राहिले तर भडका (बलात्कार) उडणारच ना, असे विधान पाकिस्तानचे मुस्लिम धर्मगुरू तारिक जमील (Maulana Tariq Jameel) यांनी केले आहे. पंतप्रधान इम्रान खान बलात्काराच्या वाढत्या घटनांविरोधात कायदा आणण्याचा विचार करत असतानाच त्यांच्या चहेत्या धर्मगुरुने हे विधान केले आहे.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये बलात्काराच्या आरोपीला सार्वजनिकरित्या फाशी देण्याची मागणी जोर धरत आहे, तर काही लोक इतर मुस्लिम देशांप्रमाणे आरोपीला नपुंसक बनवण्याची मागणी करत आहेत. अनेक मुस्लिम संघटनांनी याची मागणी केल्याने इम्रान सरकारवरील दबाव वाढत आहे. इस्लामाबाद, मुल्तान, लाहोर, कराचीसह अनेक प्रमुख शहरात इम्रान सरकारविरोधात संताप वाढत आहे.

याच दरम्यान इम्रान खान यांनी बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यासंबंधी एक ग्रेड सिस्टीम बनवण्याचा इरादा स्पष्ट केलं आहे. जेवढा घृणाप्सद गुन्हा तेवढी शिक्षा जास्त, अशी ही ग्रेड सिस्टीम असणार आहे. मात्र अनेकांनी सार्वजनिक फाशीची मागणी केली आहे. देशात बलात्काराच्या गुन्ह्याविरोधात संताप वाढत असणारा इम्रान यांच्या आवडत्या धर्मगुरूंनी अजब विधान केल्याने ते आणखी टीकेचे धनी होत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या