आंघोळीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 10 वर्षाची शिक्षा

251
girl-rape

सामना प्रतिनिधी । नागपूर

शेताजवळच्या तलावावर आंघोळीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मंथीर पुनाराम मडावी (47) रा.सोनपूर, ता. कोरची असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडित 12 वर्षीय मुलगी ही तिच्या मैत्रिणींसोबत तिच्या शेताजवळच्या तलावावर आंघोळीसाठी गेली होती. त्याच तलावावर मंथीर मडावी हादेखील आंघोळीसाठी आला होता. यावेळी पीडित मुलीच्या मैत्रिणी आंघोळ करुन घरी गेल्या. मात्र, आंघोळीनंतर पीडित मुलगी आपल्या शेतावर जाऊन झुल्यावर झुलत होती. त्यावेळी मंथीर मडावी याने तिला गॅरापत्तील मार्गावरील झुडपी जंगलात नेऊन बलात्कार केला. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन कोरची पोलिसांनी 2017 रोजी आरोपी मंथीर मडावी याच्याविरुद्ध कलम 373, 506, तसेच पोस्को कायद्याच्या कलम 4 व 8 अन्वये गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण होताच पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.

मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन.मेहरे यांनी पुरावे तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी मंथीर मडावी यास 10 वर्षांचा सश्रम कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले.

आपली प्रतिक्रिया द्या