पाच वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकांचा अत्याचार, नराधमांना बेड्या

22
१७ एप्रिल १२ वर्षाखाली मुलीवर बलात्कार केल्या फाशीची शिक्षा, केंद्राचा वटहुकूम जारी

सामना प्रतिनिधी । पिंपरी

पिंपरी-चिंचवडमध्ये एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर दोन सुरक्षारक्षकांनीच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजीत चासा (२०) आणि मंगल वैद (२३) असे नराधम सुरक्षारक्षकांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून दोन्ही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही मुळेच आसाममधील रहिवासी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच वर्षांची चिमुरडी सोसायटीच्या पार्किंमध्ये खेळत असताना नराधम सुरक्षारक्षकांनी तिला लिफ्टमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच याबाबत कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली. मात्र पीडित चिमुरडी भेदरलेली दिसल्याने आईने तिला विश्वासात घेत विचारणा केली असता तिने सुरक्षारक्षकांनी आपल्यासोबत केलेल्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर धक्का बसलेल्या चिमुरडीच्या आईने तात्काळ पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही सुरक्षारक्षकांना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या