पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; शिरूरच्या टाकळी हाजी येथील घटना

568
प्रातिनिधिक फोटो

टाकळी हाजी ता.शिरूर येथील श्री मंदिलकर यांच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्या पाच वर्षीय मुलीवर आरोपी दादू रामदास माळी (वय 40, रा. टाकळी हाजी) या नराधमाने बलात्कार केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. आरोपी दादू माळी याने वस्तीलगत अंगणात खेळत असलेल्या पाच वर्षांच्या मुलीला उचलूने नेले. त्यानेन तिच्यावर रविवारी सांयकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान घोडनदी पात्रालगत अमानुष बलात्कार  केला. घराबाहेर खेळत असलेली मुलगी घरी आली नाही म्हणूण शेजारच्यांच्या मदतीने तिचा  शोध घेण्यात आला. त्यावेळी मुलगी घोडनदी काठालगत रडत असल्याचा आवाज आला. मुलीजवळ दादू माळी बसलेला होता. बॅटरीचा उजेड पाहून तो पळून गेला. मुलीच्या गुडघ्याला खरचटल्याच्या  जखमा होत्या. मुलगी घाबरून शांत पडली होती. तिला तातडीने गावातील डॉ. थोरात यांच्या दवाखान्यात हलवण्यात आले. तिच्यावर जबरी संभोग झाल्याने गुप्तांगातून रक्तस्त्राव होत असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससुन रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून फरार आरोपीला दोनच तासात पोलिसांनी गजाआड केले आहे. पुढील तपास शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापूरे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या