अत्याचार इथले संपत नाही! अल्पवयीन मुलींवरील अत्याचारामुळे पालकांमध्ये भीती

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये मुलींवर होणाNया अत्याचाराच्या घटनांमुळे गालबोट लागले आहे. ११ वर्षीय मुलीवर तिचा नराधम बाप, आजोबा, सख्खा भाऊ आणि मामा अत्याचाराची घटना ताजी असतानाच बुधवारी पुण्यातील एका शाळेमध्ये चिमुरडीवर स्वच्छतागृहात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यातच पुन्हा औंध परिसरातील सोसायटीच्या पार्किंगमध्ये खेळणाऱ्या 10 वर्षांच्या चिमुकलीचा तिच्या बापानेच विनयभंग केल्याची घटना घडली. अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एैरणीवर आला आहे.

वडिलांशी ओळख असल्याचा बतावणीने शाळेतील स्वच्छतागृहात मुलीवर मंगेश तुकाराम पदमुले (वय 36) सुरक्षारक्षकाने अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. न्यायालयाने त्याला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. मंगेश याने पिडीत मुलीबरोबर ओळख असल्याचा बहाणा करून तिला स्वच्छतागृहात ढकलत घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून ‘घडलेला प्रकार कोणाला सांगितले तर बघ’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी मंगेश याला न्यायालयात हजर केले असता, त्याची वैद्यकीय तपासणी करायची आहे. त्याने अशा प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का? याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली.

पिंटू गौतमला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

पिडीत मुलगा विशेष असल्याचे माहित असतानाही आरोपी पिंटू गौतम याने त्याचे अपहरण करून अनैसर्गिक कृत्य केले. घडलेल्या प्रकाराची माहिती कोणाला सांगू नये म्हणून त्याने पिडीत मुलाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला. त्याने पिडीत मुलाला दुचाकीवरून नक्की कोठे नेले होते?. गुन्ह्यामध्ये त्याने कोणते हत्यार वापरले आहे?. पिडीत मुलाच्या अंगावरील कपडे त्याने कोठे फेकून दिले?. त्याने पिडीत मुलाबरोबर नक्की कोणत्या ठिकाणी अनैसर्गिक कृत्य केले? या प्रकरणी त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का? अशा प्रकारे त्याने आणखी गुन्हे केले आहेत का?, याचा तापस करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जी. पोंक्षे यांनी त्याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

मानलेल्या मामानेच केला अत्याचार

आईच्या मानलेल्या भावानेच 13 वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोथरूड परिसरात घडला आहे. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारून टाकीन, अशी धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे पीडित मुलीने घडलेल्या प्रकाराची वाचत्या केली नव्हती. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आरोपी महिलेचा मानलेला भाऊ असून तो तक्रारदाराच्या घरी राहायला येत होता. तक्रारदार आणि त्यांचे पती साहित्य आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ‘तुझा व्हिडिओ माझ्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आहे. तू कोणाला सांगितलेस, तर मी तुला आणि तुझ्या आई-बाबांना मारून टाकीन,’ अशी धमकी आरोपीने दिली. घाबरलेल्या पीडितीने ही घटना काही महिने आई-वडिलांना सांगितली नव्हती. मात्र, काही दिवसांनी माहिती कळल्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दिली.