नागपूर – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार, दोन सख्ख्या भावांना अटक

1233

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील चिमुकलीवरील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच गंगापूर-टाकळघाट येथे दोन सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीचे महिनाभरापूर्वी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने खळबळ माजली आहे. आकाश संजय कारमोरे (27) व शुभम संजय कारमोरे (वय 21, दोघेही गंगापूर झोपडपट्टी, टाकळघाट) या दोन भावांना पोलिसांनी अटक केली आहे.

14 वर्षीय पीडिता मूळची भंडारा जिल्ह्यातील लाखनीची आहे. आई आणि वडील शिवभक्त असल्याने आई बुटीबोरी परिसरातील टेंभरी येथे राहाते व एका विश्रामगृहात मजूरी करून उदरनिर्वाह करते. पीडित मुलगी लाखनी येथे शिकत असून दिवाळीच्या सुटीत ती आईकडे आली होती. आकोपी आकाशने तिचा मोबाईल क्रमांक मिळवून तिच्याशी संपर्क साधला व गोडीगुलाबीने बोलून तिला आमिष दाखवली. मुयानंतर आरोपींनी तिला पळवून नेले. दुसरीकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. नातेवाईकांना हा प्रकार कळताच त्यांनी तिला शोधून पोलीस ठाण्यात आणले.

महिला पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. आकाशने तिच्याशी अनेकदा शरीरसंबंध ठेवले. तसेच आकाशने तिला गंगापूर येथील त्याच्या मामाकडे ठेवल्याचे सांगितले. आकाशने पीडितेला आई-वडील नसल्याचे कारण मामाला सांगितले होते. तिथे शुभमनेही तिच्याशी शरीर संबंध ठेवल्याचे सांगितले. एमआयडीसी पोलिसांनी भादंवि कलम 363, 366 व 376 नुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या