नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

23

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपूरच्या अमरावती रोडवरील सिव्हिल लेन भागात असलेल्या आमदार निवासमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. मागील ३ दिवसांपासून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार सुरू होते. या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली. जत मंढरे आणि मनोज भगत अशी या नराधमांची नावं आहे.

शासकीय वास्तूमध्ये असा प्रकार घडल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय. मात्र आमदारांची चिठ्ठी असल्याशिवाय आमदार निवासात कुणालाही राहण्याची परवानगी दिली जात नाही. इतका बंदोबस्त असताना मग अशी घटना घडते कशी?, असा सवाल निर्माण झाला आहे. तर या प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्या आरोपींना कधी गजाआड करणार हे आव्हानही पोलिसांसमोर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या