आयटी कंपनीत काम करणाऱ्या विदेशी तरुणीवर बलात्कार

सामना ऑनलाईन । हरयाणा

हरयाणामधील गुरुग्राम शहरातील आयटी कंपनीमध्ये 23 वर्षीय स्पॅनिश तरुणीवर बलात्कार झाला आहे. तरुणी स्पॅनिशमधल्या महाविद्यापीठात सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होती. एका तरुणाने तिला पार्टीच्या बहाण्याने बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुग्राममधील एका मोठ्या आयटी कंपनीत ही तरुणी एक वर्षाची इंटर्नशिप करण्यासाठी आली होती. त्यासाठी ती एक महिन्यापासून गुरुग्राममध्येच राहत होती. कामादरम्यान फेसबुकद्वारे तिची अंजनेय नावाच्या 36 वर्षीय तरुणाशी मैत्री झाली. अंजनेय हा दिल्लीचा रहिवासी आहे. त्याने इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली असून तो फिल्ड प्रॉडक्शन हाउसमध्ये काम करीत होता. हळूहळू दोघांची चॅटिंगच्या माध्यमातून ओळख वाढली. शुक्रवारी त्याने तरुणीला पार्टीचे आंमत्रण देऊन तिला डीएलएफ फेज-1 च्या जी-ब्लॉकमध्ये येण्यास सांगितले.

पार्टीमध्ये अंजनेयचे इतर मित्र देखील होते. मात्र, ते मद्यपान करून झोपून गेले. त्यानंतर संधी साधून अंजनेयने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्ल केला. शनिवारी पहाटे तरुणीने कंट्रोल रुमला संपर्क साधला आणि घडलेली संपूर्ण घटना सविस्तर सांगितली. पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता घटना स्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या