आरोपीशीच लग्न करायचे आहे, बलात्कार पीडितेची सर्वोच्च न्यायालयात धाव

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीला कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. आता याच आरोपीशी लग्न करण्यासाठी पीडित तरुणीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पीडित तरुणीने आरोपीला जामिनावर सोडावे अशी मागणी केली आहे.

केरळमध्ये रॉबिन वडक्कुमचेरी या व्यक्तीने 2018 साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. बलात्कारानंतर पीडित मुलीने एका बाळालाही जन्म दिला होता. आरोपी रॉबिनवर कारवाई झाल्यानंतर पीडितेने सांगितले की शरीरसंबंधासाठी आपली संमती होती. परंतु पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत कारवाई केली होती. कोर्टाने आरोपीला 20 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आता पीडितेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आरोपीला सोडले जावे अशी मागणी करत त्याच्याशी आपल्याला लग्न करायचे असे पीडित तरुणीने म्हटले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या