सात वर्षे मारहाण करीत बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

24

सामना प्रतिनिधी । नागपूर

सात वर्षांपासून मारहाण करीत एका तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सनी गजभिये (३०) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी सक्करदरा भागातील भांडे प्लॉट येथे राहतो. त्याची वस्तीतीलच संबंधित तरुणीसोबत २०११ मध्ये ओळख झाली. सुरूवातीला आर्थिक मदत करीत त्याने ओळख वाढवली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. तेव्हापासून त्यांच्यात शरीरसंबंध प्रस्थापित झाले. नंतर मात्र सनी तिला चाकूचा धाक दाखवून सतत मारहाण करायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा. अखेर या सर्व जाचाला कंटाळून या तरुणीने सक्करदरा ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार, सक्करदरा पोलिसांनी आरोपी सनी गजभियेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या