
अमेरीकेतील एक मॉडेल केवळ दिवसातले 6 तास खर्च करुन कोट्यावधी रुपये कमावते. ही मॉडेल सोशल मीडायावर प्रचंड सक्रिय असून इंस्टाग्रामवर तिचे 16.2 मिलीअन फॉलोअर्ल आहेत.
डॅनिअल ब्रेगोली असे त्या महिलेचे नाव असून ती व्यावसायाने रॅपर आणि मॉडेल आहे. तिच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 19व्या वर्षी तिने कोट्यावधी संपत्ती कमावली आहे. अमेरीकेला राहणाऱ्या ब्रेगोलीच्या म्हणण्यानुसार ती सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याबरोबर ती खासगी सेशनसाठीही पैसे घेत होती. नुकतीच ती एका टॉक शोमध्ये गेली होती. तिने तिच्या चाहत्यांबाबत सांगितले की, वयाच्या विशीपासून चाळीशीपर्यंतचे पुरुष तिच्याशी थेट मेसेजद्वारे बोलण्यासाठी पैसे मोजतात. यापैकी बऱ्याचजणांना माझ्या वयाच्या मुली असतील. ब्रेगोली इंस्टाग्राम पोस्टवरुन चांगली कमाई करते.
ब्रेगोली खरंतर OnlyFans या संकेतस्थळावरुन पैसे कमावते. तिचे फोटो, व्हिडीओ पाहण्यासाठी लोकं डॉलरमध्ये तिला पैसे देतात. थेट मेसेजद्वारा बोलण्यासाठी ती त्याचे वेगळे पैसे आकारते. सोबत तिचे चाहते त्यांचे महिन्याचे सबस्क्रिप्शन देखिल खरेदी करतात. OnlyFansचे प्रवक्त्यांनी वरायटी डॉट.कॉम वरुन या बातमीला दुजोरा दिला होता. ब्रेगोलीने सहा तासात 8 कोटींची कमाई केली होती.
स्वत:ला फॅशन आयकॉन मानणाऱ्या ब्रेगोलीचे म्हणणे आहे की, कोणी तिचे ग्रुमिंग केले नव्हते. तिने सगळं काही स्वत:च्या हिंमतीवर केले आहे. ती सांगते तिचे सगळे निर्णय ती घेते आणि हे ती लहान वयापासून करते. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या कमाईची रिसिप्टही शेअर केली होती. तिने वर्षभरात 52 मिलियन डॉलरहून अधिक कमाई केली आहे.
View this post on Instagram
डॅनिअल ब्रेगोलीच्या म्हणण्यानुसार, ती एवढ्या कमी वयात एवढे पैसे कमावत असल्याने अनेकांना ही गोष्ट खटकते. पण तेच लोकं नावं ठेवतात जे तिच्या एवढे पैसे कमाऊ शकत नाहीत. ब्रेगोलीने तिच्या अकाऊंटवरुन पोस्ट केलेल्या फोटोला लाखो लाईक्स मिळतात.