अमेरिकेत आढळला दुर्मिळ निळ्या रंगाचा झिंगा, फोटो व्हायरल

अमेरिकेत मासेमारी करताना एका व्यक्तीला दुर्मिळ निळ्या रंगाचा झिंगा सापडला आहे. या झिंग्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.blue-lobster

अमेरिकेत कॅप्ट जो अँड सन्स ही झिंगा विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीचा कर्मचारी टॉबीला झिंगा पकडताना त्याच्या गळाला हा दुर्मिळ झिंगा लागला.

blue-lobster-2

टॉबीने हा झिंगा दुकानात आणला आणि आपल्या मालकाला दाखवला. कंपनीने या झिंग्याचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले.

blue-lobster-3

 

नंतर या दुर्मिळ निळ्या रंगाच्या झिंग्याला पुन्हा सोडण्यात आले. दोन तीन वर्षातून एखाद वेळेला अशा प्रकारचा झिंगा जाळ्यात अडकतो असे कंपनीने सांगितले.

blue-lobster-5

हा झिंगा अतिशय दुर्मिळ असून दोन कोटी झिंग्यामध्ये एखादा असा झिंगा आढळतो असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

blue-lobster-5

 

आपली प्रतिक्रिया द्या