लतादिदी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा दुर्मिळ फोटो पाहीलाय ?

20

सामना ऑनलाईन, मुंबई

स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी आहे, प्रत्येक जण आपापल्या परीने त्यांना आदरांजली वाहतोय. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली. ही आदरांजली वाहण्यासाठी त्यांनी एक ट्विट केलंय, या ट्विटमध्ये लतादिदी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अत्यंत दुर्मिळ फोटो बघायला मिळतोय. हे ट्विट आणि त्यातील दुर्मिळ फोटो तुम्हीही बघू शकता

लतादिदींनी आणखी एक ट्विट केलंय ज्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेले आणि लतादिदींनी गायलेल्या जयोस्तुते ‘श्रीमहन्मंगले | शिवास्पदे शुभदे’ या गाण्याची लिंक दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या