उन्हात गेल्यास मृत्यूचा धोका, 20 वर्षांपासून घालतेय हेल्मेट; तरुणीच्या विचित्र आजारापुढे डॉक्टर हतबल

1633

जगभरात असे अनेक आजार आढळतात ज्यावर वैद्यकीय शास्र अद्यापही उपचार शोधू शकलेले नाही. असाच एक आजार मोरोक्को येथे राहणाऱ्या फातिमा झारा घावेजी (Fatima Zahra Ghazaoui ) नावाच्या तरुणीला झाला आहे. फातिमा हिला त्वचेसंबंधीचा एक दुर्मिळ आजार जडला असून यामुळे गेल्या दोन दशकांपासून ती अंतराळावीर घालतात तसे हेल्मेट घालून फिरावे लागते आहे.

‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार, फातिमा हिला ‘जेरोडेरमा पिग्मंतोसम’ नावाचा त्वचेचा दुर्मिळ आजार आहे. फातिमा विना हेल्मेट उन्हात बाहेर जाऊ शकत नाही. उन्हाचा स्पर्श जरी तिच्या त्वचेला झाला तरी मृत्यू ओढावू शकतो. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून ती हेल्मेट घातल्याशिवाय बाहेर पडत नाही.

screenshot_2020-07-27-21-34-48-382_com-android-chrome

फातिमा 13 वर्षांची असताना तिला हा आजार जडला. उन्हात बाहेर पडल्याने अल्ट्रावायलट किरणांमुळे तिच्या चेहऱ्यावर जखमा होऊ लागल्या आणि नैसर्गिक गुणधर्मानुसार या जखमा भरूनही येत नव्हत्या. तज्ज्ञांनी तपासणी केल्यावर ही एक जेनेटिक समस्या असल्याचे निदान करण्यात आले. या आजारामुळे तिला शाळेतही जाता आले नाही आणि 13 वर्षांची असतानाच शाळा सुटली व शिक्षण अर्धवट राहिले.

आपली प्रतिक्रिया द्या