नाशिक : ‘रासबिहारी’च्या विद्यार्थिनींना राष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक

476

नाशिक येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलच्या इयत्ता नववीतील दोन विद्यार्थिनींनी आपल्या सर्जनशील लेखनाने राष्ट्रीय स्तरावरील निबंध लेखन स्पर्धेत तृतीय पारितोषिक मिळविले आहे.

मानव संसाधन विकास मंत्रालय आणि नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 25 व्या पी. एन. पण्णीकर नॅशनल डिजिटल रीडिंग मंथ- 2020 च्या निमित्ताने महिनाभर 19 जून ते 17 जुलैदरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात निबंध लेखनासह कला, मुक्त कला व प्रश्नमंजुषा स्पर्धा आदींचा समावेश होता. निबंध लेखन स्पर्धेत नाशिक येथील रासबिहारी शाळेतील इयत्ता नववीच्या उन्नती सिन्हा व कस्तुरी जाधव यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

या उपक्रमादरम्यान वाचनाचे महत्त्व सांगणारी व लहान मुलांना आवडणाऱ्या दहा प्रसिद्ध पुस्तकांची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. शिक्षिका मिताली भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘द गर्ल हू हेटेड बुक्स’ या कथेच्या वाचनात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आपल्या भाषा शैलीचा विकास करण्याची प्रतिज्ञा घेतली. रासबिहारीच्या इयत्ता सहावी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्य व कल्पनाशक्तीच्या सहाय्याने चित्रकला, मुक्त कला, निबंध लेखन व प्रश्नमंजुषा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांना प्राचार्य व शिक्षकवृदांचे मार्गदर्शन लाभले. लॉकडाऊन काळातील वाचनाचा अनुभव विद्यार्थ्यांनी कथन केला. या आभासी युगातही विद्यार्थ्यांची पुस्तक वाचनाची आवड वाढणे आश्वासक आहे. या उपक्रमामुळे मुलांना कौशल्य विकासाला एक सर्जनशील व नाविन्यपूर्ण डिजिटल स्वरूप मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या