‘कुलस्वामिनी’ने दिला दैवी अनुभव

73

सामना अॉनलाईन, मुंबई

स्टार प्रवाहवर ‘कुलस्वामिनी’ मालिका सुरू आहे. यात कुलस्वामिनी रेणुकामातेचा महिमा साकारण्यात आला आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मी अनपट हिनेही चक्क देवीच्या दैवी अनुभूतीचा अनुभव घेतला. एका प्रसंगाच्या चित्रीकरणानिमित्त रश्मीला माहूरगडावर जाण्याची संधी मिळाली. त्यावेळी माहूरमध्ये दिवसा कडाक्याचं ऊन असतं. संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता होती. पण चित्रीकरण संपताच पाऊस सुरू झाला. ही आमच्यासाठी दैवी अनुभूती ठरली, असे रश्मी सांगते.

आपली प्रतिक्रिया द्या