
>> योगेश जोशी
दिनविशेष – मंगळवारी अनुराधा नक्षत्र असून शोभन योग आहे. कार्तिक मासाला सुरुवात होणार आहे. अभ्यंगस्नान, बलिप्रतिपदा, अन्नकूट, गोवर्धन पूजा आहे. विक्रम संवत 2080 राक्षस नाम संवत्सर सुरू होत आहे. पंचागानुसार आज साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने शुभ दिवस आहे. आज कर्क, सिंह, कन्या, तूळ, मकर आणि मीन या राशींसाठी चांगला दिवस आहे.
राहू काल – दुपारी 3.00 ते 4.30 वाजेपर्यंत
मेष
मेष राशीला आजचा दिवस संमिश्र आहे. आठव्या स्थानात चंद्र असल्याने प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. तसेच महत्त्वाच्या कामांमध्ये संयम दाखवावा लागेल. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. अनोळखी व्यक्तीवर लगेचच विश्वास ठेवणे नुकसानीचे ठरू शकेल. प्रॉपर्टी खरेदी-विक्री किंवा आर्थिक व्यवहार पुढे ढकलणे फायद्याचे होणार आहे. विनाकारण चिडचिड केल्याने घरातील वातावरण तणावाचे होऊ शकते.
वृषभ
वृषभ राशीला आजच्या दिवशी आर्थिक गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. सप्तमात चंद्र असल्याने जोडीदाराकडून सहकार्य मिळणार आहे. तसेच भागीदारीतील व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. आईच्या माहेरहून आर्थिक लाभाचे योग आहेत. मालमत्तेशी संबंधित प्रकरणात यश मिळण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
मिथुन
मिथुन राशीला आज वादविवाद टाळण्याची गरज आहे. सहाव्या स्थानात चंद्र असल्याने वाणीवर संयम ठेवावा लागेल, अन्यथा समस्या उद्भवू शकते. कुटुंबातील गैरसमज वाढणार नाही, याकडे लक्ष द्या. परिश्रम आणि कठोर मेहनतीचे फळ कार्यक्षेत्रात मिळणार आहे. सर्वांना सोबत घेत काम करण्याचा प्रयत्न करा. व्यवहारात स्पष्टता ठेवा. कार्यक्षेत्रात अचानक लाभाचे योग आहेत.
कर्क
कर्क राशीला आजचा दिवस उत्तम आहे. पंचम स्थानात चंद्र असल्याने शुभसमाचार मिळे. कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे. काळाची गरज ओळखत विवेकाने निर्णय घेतल्यास आजचा दिवस चांगला आहे. विविध क्षेत्रातील कामगिरीचे कौतुक होईल. आपल्यामागील कामे वाढवू नका, अन्यथा वेळेचे नियोजन करणे कठीण होईल. कठोर वाणीने कुटुंबासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीची योजना आखण्यासाठी चांगला दिवस आहे. मात्र, योग्य विचार करूनच गुतंवणुकीचा निर्णय घ्यावा लागेल.
सिंह
सिंह राशीला आजचा दिवस आनंदाचा जाणार आहे. चतुर्थात चंद्र असल्याने अनेक दिवसानंतर जवळच्या नातेवाईकांची भेट होण्याचे योग आहेत. त्यामुळे मनात प्रसन्नता राहील. तसेच घरासाठी काही वस्तूंची खरेदी करण्याचे योग आहेत. मात्र, विनाकारण वाद घालणे टाळा. आहारातील पथ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नवीन कामाची सुरुवात पुढे ढकलणे फायद्याचे असेल. एखाद्याला दिलेला शब्द पूर्ण करावा लागेल.
कन्या
कन्या राशीला आजचा दिवस सुखाचा असेल. तृतीयात चंद्र असल्याने मानसन्मान वाढण्याचे योग आहेत. मात्र, आजची कामे पूर्ण करण्यासाठी धीराने घ्यावे लागेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. कार्यक्षेत्रात आवडीने काम मिळाल्याने मन प्रसन्न असेल. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत कामे पूर्ण करण्यावर भर द्या. घरातही आनंदाचे वाचावरण असेल.
तुळ
तूळ राशीला आजचा दिवस शुभ आहे. द्वितीय स्थानात चंद्र असल्याने घरातील वादविवाद दूर होणार आहेत. तसेच आगामी योजनांना गती मिळणार आहे. बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील कामांचे नियोजन योग्य पद्धतीने करावे लागेल, अन्यथा ऐनवेळी धावपळ होणार आहे. कुटुंबीय सणासाठी एकत्र येणार असल्याने मतभेद व्यक्त करू नका. अन्यथा शब्दाला शब्द वाढल्याने मन अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांना दिलेला शब्द पूर्ण करावा लागेल.
वृश्चिक
वृश्चिक राशीला आजचा दिवस फायद्याचा आहे. धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी शुभ दिवस आहे. प्रथम स्थानात चंद्र असल्याने मनात अस्वस्थता राहील. सृजनशील कार्यात वाढ होईल. नोकरीसोबतच पार्ट टाईम काम सुरू करण्याचे योग आहेत. त्याचा फायदा होणार आहे. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरात आपल्यामुळे वातावरण बिघडणार नाही, याची काळजी घ्या.
धनु
धनु राशीला आजचा दिवस जपून राहण्याचा आहे. व्ययात चंद्र असल्याने आर्थिक व्यवहार जपून करावेत. कोणत्याही गोष्टीत सावध राहण्याची गरज आहे. प्रॉपर्टी खरेदी करताना आवश्यक गोष्टींकडे लक्ष द्या, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. कार्यक्षेत्रात कोणावरही विसंबून राहू नका, अन्यथा कामात विलंब होण्याची शक्यता आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर राग आणि चिडचिड टाळणे हिताचे आहे. तुमच्या सवयीमुळे कुटुंबातील सदस्य नाराज होण्याची शक्यता आहे.
मकर
मकर राशीसाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. उत्पन्नात वाढ होण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. अपेक्षेएवढा लाभ होत नसल्याने निराश वाटेल. कुटुंबात समाधानाचे वातावरण असेल. आता केलेल्या कामाचे भविष्यात चांगले फळ मिळणार असल्याने नेटाने काम करा. एखादी योजना पूर्ण होण्यासाठी अनुकूल काळ आहे. जुने मित्र भेटून मन प्रसन्न होणार आहे.
कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस कर्तृत्व गाजवण्याचा आहे. दशम स्थानात चंद्र असल्याने तुमच्या कार्यकौशल्याला चांगला वाव मिळणार आहे. बोलण्यात आणि वागण्यात गोडवा ठेवत आपले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कायदेशीर प्रकरणे, कागदपत्रे याकडे लक्ष द्या. एखादा जाणाकराचा सल्ला फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे तुमचे काम सोपे होणार आहे. स्वत:च्या कामावरच लक्ष केंद्रित करा, अन्यथा तुमच्यावरील कामाचा बोजा वाढणार आहे.
मीन
मीन राशीला आज नशिबाची साथ मिळणार आहे. भाग्य स्थानात चंद्र असल्याने योजलेल्या कामांमध्ये यश मिळणार आहे. त्यामुळे नावलौकिक वाढणार आहे. नवीन योजनांना गती मिळेल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रात इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करत कामचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करा. कुटुंबीयांच्या संमतीशिवाय कोणतीही गोष्ट करू नका. सणाच्या निमित्ताने नातलग भेटण्याचे योग असल्याने दिवस आनंदात जाणार आहे.