
>> योगेश जोशी
दिनविशेष – गुरुवारी मूळ नक्षत्र असून सुकर्मा योग आहे. कार्तिक शुद्ध तृतीया आहे. तसेच विनायक चतुर्थी आणि महालय समाप्ती आहे. पंचागानुसार आज शुभ दिवस आहे. आज मेष, मिथुन, सिंह, कन्या, तूळ,वृश्चिक आणि मीन या राशींसाठी चांगला दिवस आहे.
राहू काल – दुपारी 12.00 ते 1.30 वाजेपर्यंत
मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून होत असल्याने नशिबाची साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याचे योग आहेत. कार्यक्षेत्रातील अडचणी दूर होणार आहेत. भावंडांशी वाद होण्याची शक्यता असल्याने संयमाने वागा. कुटुंबियांसह पिकनिकला जाण्याचे बेत आखू शकता. सणाचा काळ संपल्याने आळस झटकून कामाला सुरुवात करावी लागणार आहे.
वृषभ
वृषभ राशीला आज प्रकृतीची काळजी घेत आणि खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. चंद्र अष्टमात असल्याने आरोग्याकडे लक्ष द्या. आवश्यक ती कामे लवकर पूर्ण करण्यावर भर द्या. कामाची यादी करून नियोजन केल्यास त्याचा फायदा होईल. नोकरी- व्यवसायात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. घाईगडबडीत एखादी गोष्ट केल्यास त्यात त्रुटी राहू शकतात.
मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस चांगला आहे. सप्तम स्थानात चंद्र असल्याने जोडीदाराची साथ मिळणार आहे. तसेच भागीदारीतील व्यवसायात फायदा होणार आहे. काही योजना रखडल्या तर त्या पुन्हा सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे. आज घरात आणि कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. सामाजिक कार्यत असणाऱ्यांनाही आजचा दिवस चांगला आहे.
कर्क
कर्क राशींनी आज सांभाळून राहण्याची गरज आहे. सहाव्या स्थानात चंद्र असल्याने कामाचा व्याप वाढणार आहे. मात्र, कामाच्या व्यापात आरोग्याकडे दूर्लक्ष करू नका. आजचा दिवस परिश्रम आणि मेहनत करण्याचा आहे. व्यवहारात कोणतीही गफलत करू नका. एखाद्याकडून पैसे उधार घेतले असतील तर ते वेळेत परत करावे, अन्यथा वाद ओढवण्याची शक्यता आहे.
सिंह
सिंह राशीला आजचा दिवस उत्तम आहे. पंचम स्थानात चंद्र असल्याने मुलांबाबत शुभ समाचार मिळाल्याने घरातील वातावरण प्रसन्न असेल. प्रेमसंबंध असणाऱ्यांनी विवाहाचा विचार आणि बोलणी करण्यास चांगला दिवस आहे. व्यवसायात लाभाचे योग आहेत. घरातील समस्यांपासून सुटका होणार आहे. कोणत्याही वादात मत व्यक्त करू नका, अन्यथा वाद अंगाशी येऊ शकतो. नोकरीसोबतच इतर काही गोष्टी सुरू करण्यास चांगला काळ आहे.
कन्या
कन्या राशीला आज घरात अडकून राहावे लागेल. चंद्र चतुर्थात असल्याने घरातील कामे वाढणार आहेत. तसेच नोकरी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. जमीन, वाहन इत्यादी खरेदी करण्यासाठी चांगला काळ आहे. मात्र, कागदपत्रे आणि इतर कायदेशीर बाबींच्या पूर्ततेकडे लक्ष द्यावे. कुटुंबासाठी वेळ काढावा लागेल. कुटुंबियांशी चर्चा केल्यास अनेक समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
तुळ
तूळ राशीला आजचा दिवस कर्तृत्व गाजवण्याचा आहे. त्यामुळे धैर्य आणि शौर्य वाढ होणार आहे. चंद्र तृतीयात असल्याने भाऊ-बहीण यांचे चांगले सहकार्य मिळणार आहे. केलेल्या कमासाठी प्रशंसा होण्याचे योग आहे. उत्साहाच्या भरात कोणतेही काम ओढवून घेऊ नका, अन्यथा त्यात वेळेचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. लांबच्या प्रवासाचे योग आहेत. मात्र, प्रवासात काळजी घेण्याची गरज आहे. व्यावसायिकांना मोठी ऑफर मिळाल्याने त्यांचा फायदा होणार आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस लाभाचा आहे. द्वितीय स्थानात चंद्र असल्याने अचानक धनलाभाचे योग आहेत. त्यामुळे कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल. सृजनात्मक कामे करण्याचा कल वाढेल. कार्यक्षेत्रात सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे अधिकारी आणि कनिष्ठाचे सहकार्य मिळणार आहे. त्यामुळे ठरलेले काम वेळेत पूर्ण होणार आहे. त्यामुळे अधिकारी खूष असतील.
धनु
धनू राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. प्रथम स्थानात चंद्र असल्याने नैराश्य जाणवेल. मात्र, नैराश्य दूर ठेवत कामे हातावेगळी करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. प्रभावी वाणीमुळे महत्त्वाच्या कामात यश मिळणार आहे. तसेच आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. मात्र, नवीन काम सुरू करण्यासाठी काही का वाट बघावी लागेल. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रियजनांसाठी वेळ काढावा लागेल. त्यामुळे मन प्रसन्न होईल.
मकर
मकर राशीला आज खर्चाकडे लक्ष देण्याची गरज आहे. चंद्र व्ययात असल्याने अचानक खर्चात वाढ होऊ शकते. तांत्रिक बिघाडामुळे कार्यक्षेत्रात कामे रखडू शकतात. त्यांचा व्याप वाढणार आहे. परदेशातून एखादा शुभ समाचार मिळू शकतो. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घातला तरच गुंतवणुकीचा विचार करता येणार आहे. मात्र, आजच्या दिवसात कोणताही अनाठायी खर्च करू नका. घरातील वातावण तणावाचे असेल.
कुंभ
कुभ राशीला आजचा दिवस फायद्याचा असेल. अकाराव्या स्थानात चंद्र असल्याने व्यावसायिकांना मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. करिअरबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठीही दिवस चांगला आहे. आर्थिक उन्नतीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. विरोधकांपासून सावध राहवे लागेल. आपले काम वेळेत पूर्ण केल्यास मनावर दडपण येणार नाही. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.
मीन
मीन राशीला आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. चंद्र दशमात असल्याने कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळणार आहे. तसेच कामाचा व्यापही कमी होणार आहे. त्याचे सकारात्मक परिणाम होतील. अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. रखडलेली प्रशासकीय कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती आणि बदलीचे योग आहेत. त्यामुळे योग्य निर्णय घेतल्यास त्याचा फायदाच होणार आहे.