
>> योगेश जोशी
दिनविशेष – शुक्रवारी पूर्वाषाढा नक्षत्र असून धृती आणि शूल योग आहे. कार्तिक शुद्ध चतुर्थी आहे. पंचागानुसार आज शुभ सामान्य आहे. आज मेष, मिथुन, सिंह, कन्या, तूळ,वृश्चिक आणि मीन या राशींसाठी चांगला दिवस आहे.
राहू काल – सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत
मेष
मेष राशीला आज नशिबाची साथ मिळणार आहे. चंद्र भाग्य स्थानात म्हणजेच धनु राशीत आहे. नशिबाची साथ मिळणार असली तरी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा होत असलेल्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. कार्यालयात सहकारी आणि घरात कुटुंबियांशी कोणत्याही विषयावर वाद न घालता शांततेत दिवस घालवा. लहान प्रवास होण्याची शक्यता आहे. त्यातून फायदा होईल.
वृषभ
वृषभ राशीला आज आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चंद्र अष्टमात असल्याने जुनी दुखणी डोके वर काढण्याची शक्यता आहे. हातातील कामांना प्राधान्य देणे हिताचे ठरणार आहे. खाण्या – पिण्याची पथ्याकडे दुर्ल केल्याने प्रकृतीच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करायला आजचा दिवस अनुकूल नाही. त्यामुळे महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढल्याने थकवा जाणवेल.
मिथुन
मिथुन राशीला आज चांगला दिवस आहे. चंद्र सातवा स्थानी असल्याने दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. कुटुंबिय आणि मित्रांच्या सहवासात मेजवानी, सहल, किंवा मनोरंजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने व वाहन खरेदी करू शकाल. प्रेम संबंधासाठीही चांगला दिवस आहे. मानसन्मानाचे योग असून लोकप्रियता वाढणार आहे. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल. दांपत्यसुखाची प्राप्ती झाल्याने घरातील वातावरण प्रसन्न असेल.
कर्क
कर्क राशीला आज सांभाळून राहण्याची गरज आहे. नको कामे आणि दुखणी मागे लागण्याची शक्यता आहे. त्यातच दिवसातील बराच वेळ जाणार आहे. चंद्र सहावा स्थानी असल्याने घरातील कामचा व्याप वाढणार आहे. कुटुंबियासाठी वेळ काढावा लागेल. कार्येक्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे. प्रकृतीत सुधारणा होईल. मात्र, घरात इतरांच्या कुरबुरी सहन कराव्या लागतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
सिंह
सिंह राशीला आजचा दिवस प्रसन्नतेत जाणार आहे. चंद्र पंचम स्थानात असल्याने शुभ समाचार मिळण्याचे योग आहेत. मुलांची शिक्षणात प्रगती होणार आहे. शारीरिक व मानसिकदृष्टया उत्साह जाणवणार आहे. सृजनात्मक कामे करण्याकडे कल राहील. साहित्य लेखनाची रुची वाढणार आहे. कुटुंबियांचा सहवास लाभल्याने समाधान मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
कन्या
कन्या राशीला आजचा दिवस खरेदीतून समाधान मिळणार आहे. चंद्र चतुर्थ स्थानात असल्याने गृह, वाहन खरेदीचे योग आहेत. आज घरातील सदस्यांकडे लक्ष देत त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. कार्यक्षेत्रात प्रतिकूलता जाणवणार आहे. त्यामुळे मानसीक चिंता वाढण्याची शक्यता आहे. घरात शांतता राहण्यासाठी मनावर संयम ठेवावा लागणार आहे.
तूळ
तूळ राशीला आज मानसन्माचे योग आहेत. चंद्र तृतीय स्थानात चंद्र असल्याने कीर्ती वाढणार आहे. एखादे महत्त्वाचे काम हाती घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. योग्य क्षेत्रात केलेल्या गुंतवणूकीचा फायदा होणार आहे. कुटुंबात भावंडांचे सहकार्य मिळणार आहे. लहान प्रवासाचा बेत आखला जाईल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
वृश्चिंक राशीला आजचा दिवस लाभाचा आहे. चंद्र दुसऱ्या स्थानी असल्याने कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निराशा जाणवेल. अनावश्यक खर्च टाळले तर पैशांची बचत करण्यात यश मिळेल. तसेच अचानक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवले तर आजचा दिवस चांगला जाणार आहे.
धनू
धनू राशीला आजचा दिवस उत्तम आहे. चंद्र प्रथम स्थानात असल्याने उत्साह जाणवेल. रखडलेल्या कामात यश मिळणार आहे. तसेच आर्थिक लाभाचीही शक्यता आहे. एकादया मंगल कार्यात किंवा धार्मिक कार्यात हजर राहवे लागेल .लहान प्रवास होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांची भेट झाल्याने मन प्रसन्न राहील. दांपत्य जीवन आनंदाचे असेल.
मकर
मकर राशीला आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. चंद्र व्यय स्थानात असल्याने विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. मात्र, मेडिटेशन आणि धार्मक कार्यात मन गुंतवल्यास तणाव कमी होणार आहे. तसेच आज वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कटू बोलण्याचे नातेवाई सहकारी दुखावणार नाही, याची काळजी घ्या. जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे.
कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस लाभाचा आहे. कुंभ राशीच्या अकराव्या स्थानात चंद्र असल्याने रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. एखादे नवे काम सुरू करण्यास किंवा व्यवसायवाढीची योजना आखण्यास चांगला दिवस आहे. नोकरी – व्यवसायात लाभाची प्राप्ती होणार आहे. मित्रांच्या मदतीने प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाच्या दृष्टीने आजचा दिवस फार चांगला आहे.पर्यटनाला जाण्याचा बेत ठरणार आहे. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे.
मीन
मीन राशीला आजचा दिवस कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे. चंद्र कर्मस्थानात असल्याने कामाचा उत्साह जाणवेल. नोकरी,व्यवसायात यश मिळाल्याने आणि वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे मन प्रसन्न होईल. व्यापारात वाढीचे योग आहेत. रखडलेले पैसे वसुल होण्याची शक्यता आहे. वडीलधार्यांकडून लाभ होणार आहे. उत्पन्नाचे प्रमाण वाढणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.