Astrology । Horoscope । 20 November 2023 कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस?

>> योगेश जोशी

दिनविशेष – सोमवारी धनिष्ठा नक्षत्र असून ध्रुव योग आहे. कार्तिक शुद्ध अष्टमी आहे. दुर्गाष्टमी तसेच गोपाष्टमीही आहे. पंचागानुसार आज सायंकाळी 4.19 नंतर शुभ दिवस आहे. आज मिथुन, सिंह, तूळ, मकर आणि कुंभ या राशींसाठी चांगला दिवस आहे.

राहू काल – सकाळी 7.30 ते दुपारी 9.00 वाजेपर्यंत

मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. चंद्राचे भ्रमण कर्मस्थानातून एकादशस्थानाकडे होत आहे. त्याचा फायदा होणार आहे. आपण सर्वांचा विश्वास जिंकू शकाल. व्यावसायिक कामांना गती मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात प्रगतीचे योग आहेत. मात्र, कार्यक्षेत्रात कोणचीही चूक होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. आजच्या दिवशी संयम बाळगत अनावश्यक भांडणे टाळा. रागावर नियंत्रण ठेवल्यास घरातील वातावरण शांत राहील.

वृषभ
वृषभ राशीला आजचा दिवस प्रगतीचा असेल. चंद्राचे भ्रमण भाग्यस्थातून कर्मस्थानात होत असल्याने नशिबाच्या साथीसोबतच त्याला कर्माची जोड मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आजच्या दिवसाच अडचणींचा विचार न करता कामाच्या जोरावर त्यावर मात करण्याचे धोरण ठेवा. म्हणजे दिवस आनंदात जाईल.

मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस फायद्याचा आहे. चंद्राचे भ्रमण अष्टम स्थानातून भाग्य स्थानात होत असल्याने प्रकृतीत सुधारणा होईल. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळेल. त्यामुळे आजचा दिवस आत्मविश्वासाने वाटचाल होईल. सहलीला जाण्याचा बेत असल्यास काळजी घेण्याची गरज आहे. भागीदारीत व्यवसाय असणाऱ्यांना फायदा होण्याचे योग आहेत. जोडीदाराच्या करिअरसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदाचे असेल.

कर्क
कर्क राशीला आजचा दिवस आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सप्तम स्थानातून अष्टम स्थानात चंद्राचे भ्रमण होत असल्याने आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल, तसेच जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता आहे. तसेच प्रत्येक व्यवहारात कागदपत्रांची काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात कोणाचाही नाराजी ओढवून घेऊ नका.

सिंह
सिंह राशीला आजचा दिवस चांगला जाणार आहे. चंद्राचे भ्रमण सहाव्या स्थानातून सप्तम स्थानातून होणार असल्याने हितशत्रूंच्या कारवाया कमी होतील. घरातील कामात जोडीदाराचे सहकार्य मिळणार आहे. तसेच भागीदारीतील कामे करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात नाविन्यपूर्ण योजना आखण्यासाठीही चांगला दिवस आहे. मित्र आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कमी अंतराचे प्रवास होण्याची शक्यता आहे.

कन्या
कन्या राशीला आजचा दिवस सांभाळून राहावे लागणार आहे. चंद्राचे भ्रमण पंचम स्थानातून सहाव्या स्थानात होणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रात अडचणी येण्याची शक्यता आहे. तसेच आजच्या दिवशी गोंधळाची कामे टाळणे आणि महत्त्वाची कामे पुढे ढकलणे फायद्याचे ठरणार आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत संयम ठेवावा लागेल. कुटुंबातील महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी कुटुंबियांचा सल्ला घेतल्यास त्याचा फायदा होणार आहे. व्यवहाराशी संबंधित बाबींमध्ये सावध गिरी बाळगावी लागेल.

तुळ
तूळ राशीला आजचा दिवस चांगला असेल. चंद्राचे भ्रमण चतुर्थ स्थानातून पंचम स्थानात असल्याने आजचा दिवस सकारात्मक असेल. तुम्ही समंजसपणे निर्णय घेतल्यास त्याचा फायदा होणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ जाणार आहे. कामाच्या बाबतीत कोणावरही विसंवून राहू नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा करताना योग्य काळजी घेत तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंरच निर्णय घ्या. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक
वृश्चिक राशीला आज कोणाशीही विनाकारण वाद टाळावे लागतील. चंद्राचे भ्रमण तृतीय स्थानातून चतुर्थ स्थानात होत असल्याने घरातील वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. नावलोकिक आणिमानसन्माचे योग आहेत. अत्यावश्यक कामांवर लक्ष केंद्रित केल्यास कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल. लहान प्रवासाने फायदा होण्याची शक्यता आहे. संयमाने कामे केल्यास घरातील वातावरण समाधानाचे राहील.

धनु
धनू राशीला आजचा दिवस संमिश्र असेल. चंद्राचे भ्रमण द्वितीय स्थानातून तृतीय स्थानात होणार असल्याने दुपारपर्यंत धनलाभाचे किंवा रखडलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. तसेच सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना मानसन्माचे योग आहेत. बहीण भावातील वाद मिटून चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी चांगला दिवस आहे. कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढणार आहे. मात्र, त्याचे तुम्हाला दडपण येणार नाही. मालमत्तेशी संबंधित व्यवहारात काळजी घेणे हिताचे आहे. घरातील वातावरण समाधानाचे असेल.

मकर
मकर राशीला आजचा दिवस फायद्याचा आहे. चंद्राचे भ्रमण प्रथम स्थानातून द्वितीय स्थानात होणार असल्याने दुपारनंतर धनलाभाचे योग आहेत. सुख-समृद्धीत वाढ होणार आहे. त्यामुळे घरातील वातावरण आनंदाचे असेल. नवीन ओळखींचा फायदा होण्याची शक्यता आहे. विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका, अन्यथा वादविवाद होण्याची शक्यता आहे. संयमाने आणि शांततेने निर्णय घेतल्यास आजचा दिवस आनंदात जाणार आहे.

कुंभ
कुंभ राशीला आजचा दिवस चांगला आहे. वाढलेले खर्च आता नियंत्रणात येणार आहे. व्यय स्थानातून प्रथम स्थानात चंद्र येणार असल्याने आता मनासारख्या गोष्टी जुळून येतील. महत्त्वाच्या चर्चेतून चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन कल्पना अंमलात आणण्यासाठी चांगला दिवस आहे. तसेच सृजनात्मक कामात आवड निर्माण होणार आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे.

मीन
मीन राशीला आज आर्थिक बाबींची काळजी घेण्याची गरज आहे. तसेच कोणतीही जोखमीची आणि महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. चंद्राचे भ्रमण अकराव्या स्थानातून व्यय स्थानात होत असल्याने आज तुमच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज कामाकडे लक्ष केंद्रीत करत जबाबदाऱ्या पार पाडण्याचा दिवस आहे. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन करत खर्च करावा लागेल. आर्थिक बाबतीत सावधपणे पुढे राहावे लागेल. घरातील वातावरण समाधानाचे असेल.