सेटवरील अपघातात रश्मी देसाई जखमी

रश्मी देसाई

मुंबई

‘उतरण’ या प्रसिद्ध मालिकेत खलनायिकेची भूमिका करणारी अभिनेत्री रश्मी देसाई हीचा तिच्या आगामी मालिकेच्या सेटवर अपघात झाला असून त्यात ती जबर जखमी झाली आहे. रश्मी सेटवरुन बाहेर येत असताना एका कारशी तिची धडक झाली. या अपघातात तिचा उजवा हात व कोपराला जबर जखमा झाल्या आहेत.

‘उतरण’ ही मालिका बंद झाल्यापासून रश्मी देसाई बराच काळ छोट्या पडद्यापासून लांब आहे. त्यात ती आणि तिचा नवरा नंदिश संधू यांच्या वैवाहिक जीवनात देखील वाद निर्माण झाल्यामुळे दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आता रश्मी मोठ्या ब्रेकनंतर ‘दिल से दिल तक’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. अशातच हा अपघात झाल्यामुळे रश्मीला पुन्हा एकदा काही दिवसांचा ब्रेक घ्यावा लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या