पीक विमा मिळण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचा सोमवारी रास्ता रोको

48

सामना प्रतिनिधी । जळकोट

वांजरवाडा, धामणगाव, उमरगा (रेतू), वडगाव, उमरदरा, डोंगर कोनाळी (ता.जळकोट ) या सहा गावांतील एकाही शेतकऱ्यास खरिप हंगामाचा पीक वीमा मिळालेला नाही. तसेच तालुक्यातील इतर गावांना अर्धवट पीक वीमा मिळाला आहे. त्यामुळे सर्व वंचित शेतकऱ्यांना चार दिवसांत पीक वीमा वाटप करावा, या मागणीसाठी जळकोट तालुका शिवसेनेच्या वतीने सोमवार २ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वांजरवाडा (ता.जळकोट ) येथे रास्ता रोको व चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले यांनी तहसीलदार, जळकोट यांना दिलेल्या निवेदनाद्वारे हा इशारा दिला आहे. शिवसेनेचे लातूर जिल्हा उपप्रमुख प्राचार्य रामचंद्र आदावळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. पीक विम्यापासून वंचित गावे तसेच अर्धवट पीक वीमा मिळालेल्या गावातील राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांच्या हातून काही प्रकार घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे. या आंदोलनात संगमेश्वर टाले, माधव भुरे, शंकर धोंडापुरे, धनंजय भांगे, सुभाष बनसोडे, शेखर डोंगरे, माधव मोटे, माधव टोम्पे, यशवंत बनसोडे, दिगांबर सोमवंशी, अनील ढोबळे, मुक्तेश्वर येवरे, अभंग मोटे, अनील मुळे, सखाराम परांडे, प्रभाकर मोटे, संभाजी आगलावे, रघुनाथ केंद्रे, बालाजी ठाकूर, दत्ता लोंढे, राजू पाटील, बळीराम आगलावे आदीजण सहभागी होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या