पेहेचान कौन? नेटकरी म्हणतात हा तर हॉलिवूड स्टार

825

सोशल मीडियावर दर गुरुवारी #throwbackthursday हा ट्रेंड चालत असतो. हा हॅशटॅग वापरून नेटकरी त्यांचे अनुभव शेअर करत असतात. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी देखील आज त्यांच्या तरुणपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते अतिशय रुबाबदार दिसत आहेत. त्यांचा तो फोटो पाहून नेटकरी देखील आश्चर्यचकित झाले असून अनेकांनी तर त्यांना हॉलिवूड स्टारच म्हटले आहे.

रतन टाटा हे अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेले असताना लॉस एंजलिस येथे हा फोटो काढलेला आहे. हा फोटो पाहून अनेकांना तो रतन टाटा यांचाच आहे असा विश्वास पटत नाही. त्यांचे रुबाबदार व्यक्तीमत्त्व पाहून अनेकांनी त्यांना हॉलिवूड स्टारची उपमा दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या