रत्नागिरीत चार डॉक्टरांचे पथक रत्नागिरीत येणार, पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्यावर भर

कोरोना चाचण्या वाढवल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 8.65 टक्के इतका आला आहे. पुढील काळात दिवसाला 10 हजार कोरोना चाचण्या केल्या जातील. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपर्यंत येईल अशी आशा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नामुळे 4 डॉक्टरांचे एक पथक जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे़. हे पथक 15 दिवस जिल्ह्यात थांबून कोरोनाबाधितांचा दर कमी आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शन करेल. या पथकाने मुंबई, पुण्यासह अन्य ठिकाणीही काम केले असल्याचे उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़.

पुढे बोलताना सामंत म्हणाले की सध्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्यामुळे टाळेबंदीची आवश्यकता लागणार नाही. त्याचबरोबर डॉक्टर आकाश परब, डॉ.अमर चव्हाण, डॉ.विवेक वाघेला, डॉ़.सुहास सेजल या चारजणांचे एक पथक रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार आहे़. हे पथक पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्यावर भर देणार आहे़. यापुर्वी जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 15.7 टक्के होता़. कोरोनाच्या चाचण्या वाढवल्यामुळे तो आता 8.61 टक्के झाला आहे़. जिल्ह्यामध्ये लसीकरण मोहिमही चांगल्या पध्दतीने सुरु आहे़. आतापर्यंत 3 लाख 49 हजार 971 जणांचे लसीकरण झाले आहे़.

आपली प्रतिक्रिया द्या