रत्नागिरीत आतापर्यंत 33 जणांची कोरोनावर मात

रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी आणखी 16 जण बरे झाले असून त्यांना आज रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता जिल्ह्यातील 33 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 92 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

उपचारानंतर 33 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यापूर्वी 17 रूग्ण बरे होऊन घरी परतले होते. आज मंगळवारी 16 रूग्णांना डिश्चार्ज देण्यात आला आहे. सध्या रूग्णालयात 56 रूग्ण उपचार घेत आहेत. मिरज येथून आज सायंकाळपर्यंत 108 तपासणी अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामध्ये रत्नागिरी – 74, संगमेश्वर – 18, गुहागर – 13, मंडणगड – 3 रुग्णांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या