रत्नागिरीत आंबा घाटात ट्रक दरीत कोसळून एक जण ठार

रत्नागिरी – कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात  रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एक ट्रक दरीत कोसळला. पावस वरून हा ट्रक मलकापूर येथे चिरा घेऊन चालला होता. या ट्रक मध्ये चालक,  क्लिनर व हमाल असे तीन जण प्रवास करीत होते. या अपघातात सचिन पाटील (33) हा जागीच ठार झाला.

आंबा घाटातील गायमुखाच्या 1 किलोमीटर अलीकडे हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे सर्व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तसेच देवरूख पोलीस निरीक्षक मारुती जगताप हे सुद्धा घटास्थळी पोहचले. रात्रीच्या अंधारात साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे  रोहित यादव आणि  प्रशांत यादव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शना नुसार अंधारात खोल दरीमध्ये उतरून रेस्क्यू ऑपरेशन करून जखमींना वर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

आपली प्रतिक्रिया द्या