रत्नागिरीत ॲपेक्स कोविड हॉस्पिटलची मान्यता रद्द; रेमडेसीवीर,प्लाझ्मा थेरपीचा गैरवापर केल्याच्या तक्रारी

कोरोनाकाळात रत्नागिरीत सुरू झालेले ॲपेक्स हॉस्पिटल कायम वादात राहिले आहे. हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करून अवाच्या सव्वा बिलांवरून अनेक रूग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यापाठोपाठ आता ॲपेक्स हॉस्पिटल मध्ये रेमडेसीवीर आणि प्लाझ्मा थेरपीच्या गैरवापराबाबत रूग्ण आणि नातेवाईकांच्या तक्रारी आल्यामुळे ॲपेक्स हॉस्पिटलची डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल हि मान्यता रद्द करण्यात आली असून त्याबाबतचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी ॲपेक्स हॉस्पिटला दिले आहे.

ॲपेक्स हॉस्पिटलची डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात आली असून आता डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता या हॉस्पिटलला सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या कोव्हीड रुग्णांवरच उपचार करता येणार आहेत. हॉस्पिटलमध्ये अति गंभीर कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचार केल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देखील जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या पत्राद्वारे दिला आहे.

कोरोना रूग्णांकडून अधिक रक्कमेची बीले ॲपेक्स हॉस्पिटले घेतल्याच्या आमच्याकडे आल्या होत्या त्याचाही आम्ही अहवाल बनवला आहे. त्यानंतर आता ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये रेमडेसीवीर आणि प्लाझ्मा थेरपीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्याने आम्हाला हि कारवाई करावी लागली. रेमडेसीवीर हे इंजेक्शन हे रूग्णाला तीन दिवसात दिले पाहिजे. दहाव्या दिवशी इंजेक्शन देऊन काय उपयोग? तसेच प्लाझ्मा थेरपी कोणत्या रूग्णांवर करायची हे सुध्दा निश्चित आहे. – डॉ.संघमित्रा फुले,जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी

 

आपली प्रतिक्रिया द्या