रत्नागिरी – 24 तासात सहा तालुक्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही, मृत्यूचा आकडाही शून्य

गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचे 18 रुग्ण सापडले आहेत़. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, गुहागर आणि खेड तालुक्यात आज एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक गोष्ट घडली आहे़.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 24 तासात मंडणगडमध्ये 8, चिपळूणमध्ये 9 आणि दापोलीमध्ये 1 रुग्ण सापडला़. जिल्ह्यात आतापर्यंत 8196 रुग्ण सापडले आहेत़. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये रुग्णांची संख्या कमी झाली आहे़. आज 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली़. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7427 आहे़ विशेष म्हणजे 24 तासांमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यू झाला नाही़. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 302 झाली आहे़.

आपली प्रतिक्रिया द्या