रत्नागिरीत पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, विशेष कारागृहातही कोरोनाचा शिरकाव

372

रत्नागिरीतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार 24 तासात जिल्ह्यामध्ये 47 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 661 झाली आहे. रत्नागिरीतील विशेष कारागृहातील 8 कैदी आणि दोन पोलिसांनाही कोरोना झाला आहे. एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रूग्ण सापडण्याची रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. यातील 17 रूग्ण रत्नागिरीमधले असून कळंबणीतील 13 रुग्ण आहेत ,दापोलीतील 12 रुग्ण आहे तर चिपळूण,संगमेश्वरातील प्रत्येकी दोन रूग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या