रत्नागिरी – कुर्ली येथे क्रेनचालकाची मोटरसायकलला धडक, पोलिसाचा मृत्यू

प्रातिनिधिक

कुर्ली फाट्याजवळ मोटारसायकलला क्रेनची धडक बसून झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचार्याचा मृत्यू झाला़. अपघात करणाऱ्या क्रेनचालकाला पोलिसांनी अटक केली आहे़.

पोलीस नाईक सचिन सुदेश कुबल, वय 38 हे त्यांच्या मोटारसायकलवरुन भाट्ये ते गोळप दरम्यान प्रवास करत होते. मोटारसायकलच्या मागील सीटवर भरत पद्मसिंग बोहरा हे बसले होते. समोरुन येणाऱ्या क्रेनने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात मोटारसायकल चालक सचिन कुबल हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. क्रेनचालक राकेशकुमार यादव, वय 30 हा अपघाताची खबर न देता निघून गेला. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले आहे़.

आपली प्रतिक्रिया द्या