रत्नागिरी जिल्हा बँकेने आरबीआयकडे भरले तब्बल ११२ कोटी ८३ लाख

12

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

लाईक करा, ट्विट करा

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या स्वरुपात ११२ कोटी ८३ लाख रुपये रिझर्व्ह बँकेकडे जमा केले आहेत. आता बँकेकडे जुन्या ५०० आणि १००० रुपयांची एकही नोट शिल्लक नसल्याचे बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड आणि सीबीआयच्या माध्यमातून सर्वच बँकांच्या व्यवहाराची चौकशी करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्येही ही चौकशी झाली. मात्र जिल्हा बँकेने सर्व कारभार योग्य पध्दतीने केल्याने चौकशीत कोणतीही त्रुटी आढळली नाही. आलेल्या अधिकाऱ यांनी बँकेचे व्यवहार, बँकेत जमा झालेल्या रक्कमेबाबतची चौकशी आणि बँकेकडे असलेल्या नोटांचा तपशील तपासल्याचे डॉ.चोरगे यांनी सांगितले. १५ डिसेंबरनंतर आमच्याकडे जुन्या ५०० आणि १००० रुपयांची एकही नोट नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ५ लाख २४ हजार ५१६ खाती आहेत. त्या खात्यांपैकी ३९ हजार ०५६ खात्यांमध्ये कोणतेही व्यवहार होत नसल्यामुळे ती खाती स्थगित करण्यात आली असल्याची माहिती डॉ.तानाजी चोरगे यांनी दिली. जिल्हा बँकेच्या १९ शाखांनी केवायसीचे कामही पूर्ण केले असून अन्य बँकांमध्ये हे काम वेगाने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या