जिल्हाधिकाऱ्यांच्या मॉर्निंगवॉकने अनेकांची उडाली झोप

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

रत्नागिरीत जिल्ह्यातील पदभार स्वीकारतात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मॉर्निंगवॉकने अनेक अधिकाऱ्यांची झोप उडाली असली तरी कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाची पोचपावती मिळत आहे. अनेक अधिकारी कार्यालयीन वेळेतच बैठका घेऊन आपल्या कामाचा गाडी हाकतात. सुनील चव्हाण यांनी मात्र रत्नागिरीत जिल्हाधिकारी पदाचा कारभार स्वीकारतात अनेक अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे.

सुनील चव्हाण यांनी 14 ऑगस्टला पदभार स्वीकारल्यानंतर शहराचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून अनेक मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटी देत तेथील व्यवस्थापनाशी संवाद साधला. मंगळवारी प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरीला भेट देवून तेथील रुग्णांशी वार्तालाप केला. त्यानंतर व्यवस्थापनाशी चर्चा करत तेथील समस्या जाणून घेतल्या. तसेच मनोरुग्णालयाला भेट दिल्यानंतर 3 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली बाह्य रुग्णालय इमारत गेले अनेक महिने उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच संग्राम वार्ड, वैद्यकीय अधिक्षक कार्यालय, सेल विभाग, सुश्रुशा विभागात पहाणी करताना तेथे असणार्‍या रुग्णांची विचारपूस केली. त्यांना कोणत्या कोणत्या सुविधा मिळतात. तसेच त्यांच्या झोपण्याची व्यवस्था व्यवस्थित होते की नाही हे पाहिले. त्यानंतर त्यांनी रुग्णांना देण्यात येणार्‍या आहारासंदर्भातील किचन विभागाला भेट देऊन तेथील स्वयंपाकाची प्रत्यक्ष पहाणी केली. केलेल्या जेवणाचा दर्जा पाहिला. तसेच महिला विभागात जाऊन तेथील महिलांशी संवाद साधला.