बाजारभावापेक्षा जास्त दर आकारल्यास कारवाई किरणा व औषध विक्रेत्यांना इशारा

465

औषधे आणि किरणा मालाची दुकाने संचारबंदी कालावधीत सुरु ठेवण्यात यावे. शक्यतो आपले दुकान 24X7 सुरु ठेवावीत. ग्राहकांना घरपोच सेवा देण्याच्या प्रयत्न करा. दुकानातील माल हा त्याच्या MRP पेक्षा जास्त दराने विक्री करता कामा नये अथवा वाजवी बाजारभावापेक्षा जास्तदराने विक्री करु नये असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दुकानात सर्व प्रकारच्या वस्तूंचा आवश्यक तो साठा असणे आवश्यक आहे अशा सूचना दिल्या आहेत.

शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1987 नुसार 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे तसेच विषाणूचे प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आलेले असून त्यानुसार संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सदर संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी जीवनावश्यक सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे व आपल्या सेवा या अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने किराणा माल विक्रेता व केमिस्ट यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

 किराणा माल विक्रेत्यांनी कडधान्य व तृणधान्य संदर्भात स्वत:कडे साठा नोंदवही (Stock Register) ठेवण्यात यावी. दोन ग्राहकांच्यामध्ये किमान तीन फुट अंतर राहील या पध्दतीने ग्राहकांना दुकानात व दुकानासमोर उभे राहण्यासंदर्भात व्यवस्था करण्यात यावी. दुकानदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी माक्सचा वापर करावा तसेच दुकान व परिसरात वेळोवेळी Sanitization करावे. दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात आपणाकडे सदर वस्तूचा आवश्यक साठा उपलब्ध असल्याबाबत व त्याची विक्री MRP पेक्षा जास्त करत नसल्याबाबतचा सूचना फलक लावण्यात यावा. सदर सूचना फलकावर दुकानदाराचे नाव, दुकानात अत्यावश्यक वस्तूंचा साठा आवश्यकतेनुसार उपलब्ध आहेत. दुकानातील सर्व वस्तू या MRP च्या दरात विक्रीस उपलब्ध आहेत. काही तक्रार असेल तर जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथील मदत केंद्र दूरध्वनी क्रमांक (Help Line Number-02352-222233 व्हॉटसअप नं.7057222233) आदी बाबी नमूद कराव्यात.

आपली प्रतिक्रिया द्या