रत्नागिरीत कोविड योध्यांचा सत्कार, प्रशस्तीपत्रक देऊन पाठीवर कौतुकाची थाप

626

कोरोनाबाधित क्षेत्रात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या ९० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोविड योध्दा प्रशस्तीपत्रक देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याहस्ते कोविड योध्यांचा गौरव करण्यात आला. रत्नागिरी शहरात कोरोनाबाधित क्षेत्रात पोलीस कर्मचारी अहोरात्र बंदोबस्तात तैनात आहेत. कोरोना रूग्ण सापडलेला परिसर हा कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येतो.या क्षेत्रात कुणालाही ये-जा करण्याची मुभा नसते. कोरोनाबाधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्त कड़क करण्यात येतो.पोलीस अधिकारी आणि कर्मचारी २४ तास बंदोबस्तात असतात. अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप प्रशासनाने दिली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याहस्ते पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बघाटे,अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड उपस्थित होते. ज्या ठिकाणी हे कर्मचारी बंदोबस्तात आहेत त्या ठिकाणी प्रशासनाच्या या टीमने जाऊन त्यांचा सत्कार केला

आपली प्रतिक्रिया द्या