धक्कादायक! रत्नागिरीच्या मनोरूग्णालयातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता 5 महिन्यांची गर्भवती

1188

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना रत्नागिरीमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब ही आहे की ही मुलगी प्रादेशिक मनोरुग्णालयातील आहे. वैद्यकीय तपासणीदरम्यान ही ही मुलगी 5 महिन्यांची गर्भवती असल्याचं कळालं, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. या मुलीकडे जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा तिच्यावर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचे उघड झाले. या घटनेमुळे प्रादेशिक रूग्णालयातील महिला सुरक्षित आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पिडीत मुलीकडे चौकशी केली असता तिला अत्याचार करणाऱ्याचे नाव सांगता आले नाही, यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरूध्द पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या