रत्नागिरी नगरपरिषद जाहीर करणार करबुडव्यांची नावे, थकीत करदात्यांच्या 49 मालमत्तांना टाळे

रत्नागिरी नगर परिषदेने थकीत करदात्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. नगरपरिषदेने आत्तापर्यंत थकीत कर असलेल्या 11 सदनिका आणि गाळे सील केले आहेत. तसेच घरपट्टी चुकवणाऱ्या 52 जणांची नळपाणी जोडणी खंडित केली आहे. एप्रिलपर्यंत जर थकीत करदात्यांनी कर भरला नाही तर त्यांची नावे रत्नागिरी नगरपरिषद वर्तमानपत्रातून जाहीर करणार आहे.

मार्च महिन्यामध्ये रत्नागिरी नगरपरिषदेने करवसुलीचा धडाका लावला आहे. अनेक थकीत करदाते नगरपरिषदेच्या रडारवर आहेत. रत्नागिरी नगरपरिषदेने करवसुलीसाठी 7 पथके तयार ठेवली आहेत. ही पथके शहरामध्ये करवसुलीचे काम करत आहेत. आतापर्यंत 7 कोटी 80 लाख रुपयांचा कर वसुल करण्यात आला आहे. एकूण वसुलीच्या 65 टक्के करवसुली झाली आहे. उर्वरित करवसुली करण्यासाठी नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उचलला आहे. थकीत करदात्यांच्या 99 सदनिका आणि गाळ्यांना सील करण्यात आले आहे. तसेच घरपट्टी चुकवणाऱ्यांची नळजोडणीही तोडण्याची मोहिम नगरपरिषदेने हाती घेतली आहे. आतापर्यंत 52 जणांची नळजोडणी नगरपरिषदेने तोडली आहे. 31 मार्चपर्यंत नगरपरिषदेची वसुलीची मोहिम सुरु राहणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात जे थकीत करदाते कर भरणार नाहीत अशांची नावे रत्नागिरी नगरपरिषद वर्तमानपत्रातून जाहीर करणार आहे.