भाजपला बंडखोरीचा फटका, मुकुंद जोशी यांची अपक्ष उमेदवारी

1557

रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बंडखोरीचा फटका बसला आहे. भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद जोशी यांनी आज शेवटच्या दिवी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला. नगराध्यक्षपदासाठी एवूᆬण 5 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.

रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी भाजपकंडून अ‍ॅड़ दीपक पटवर्धन, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मिलींद कीर, मनसेकडून रुपेश सावंत आणि मुकुंद जोशी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे. मुकुंद जोशी यांनी दोन अर्ज भरले असून दुसर्‍ या अर्जात भाजपचा उल्लेख केला असला तरी त्यांच्याकडे भाजपचा एबी फॉर्म नाही. यापुर्वी शिवसेनेकडून प्रदीप उर्फ़ बंड्या साळवी यांनी आपला उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 5 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत़.

आपली प्रतिक्रिया द्या