ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम, रेल्वेगाड्या दोन ते अडीच तास उशीराने 

कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटली आहे. यामुळे पहाटे 1 वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.रात्री धावणाऱ्या महत्वाच्या सहा एक्सप्रेससह सर्वच गाड्या चार ते पाच तास रखडल्या.त्यानंतर युध्दपातळीवर ओव्हरहेड वायरचे काम करण्यात आले.दोन तासानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू झाली.सध्या कोकण रेल्वेमार्गावरच्या गाड्या दोन ते अडीच तास उशीराने धावत आहेत.
ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटल्यामुळे वेरावल- त्रिवेंद्रम एक्सप्रेसही 4 तास 24 मिनिटं उशिरा आहे. कोकणकन्या एक्सप्रेस 3 तास 30 मिनिटं उशिरा असून ही गाडी वीर स्थानकात थांबवली आहे. सावंतवाडी एक्सप्रेस गेल्या तीन तासापासून करंजाडी स्थानकात थांबली आहे. एलटीटी मडगाव एक्सप्रेस साडेतीन तासापासून सापेवामने स्थानकात थांबवण्यात आली आहे.
सीएसटीएम -मेंगलोर एक्सप्रेस साडेपाच तासापासून दिवाणखवटी स्थानकात थांबवली आहे. मत्स्यगंधा एक्सप्रेस साडेचार तासांपासून सापेवामणे स्थानकात थांबवण्यात आली आहे.