ऐन गणेशोत्सवात चिपळूण शहरात खळबळजनक घटना घडली आहे. चिपळूण बहादूर शेख नाका येथे एका तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवीगाळ केल्याच्या रागातून ही हत्या झाल्याचे कळते. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींपैकी एक जण अल्पवयीन आहे.
हमीद शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. हमीद शेखचा मृतदेह रविवारी सकाळी बहादूर शेख नाका येथे रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. हत्येची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींचा शोध घेत दोघांना ताब्यात घेतले आहे.
निलेश जाधव असे एका आरोपीचे नाव असून दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. चिपळूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि हमीद शेख हे एकमेकांच्या ओळखीचे होते. दरम्यान शिवीगाळ केल्यानंतर झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.