वेळ पडल्यास डॉक्टरची जबाबदारी पार पाडेन – पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे

2087

सध्या पोलीस अधीक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे. वेळ पडल्यास डॉक्टरचीही जबाबदारी सांभाळेन असे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी फ़ेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधताना एका नागरिकाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

संचारबंदीच्या काळात रत्नागिरी पोलीस खूप चांगले काम करत अहोरात्र रस्त्यावर उभे राहून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मरकजहून रत्नागिरीत आलेला आणि कोरोनाग्रस्त असलेल्या त्या व्यक्तीला शोधण्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांचे मोठे योगदान असल्यामुळेच अनेक रत्नागिरीकरांनी व्हॉट्स अॅप डिपीवर पोलीस डॉ. प्रवीण मुंढे यांचा फोटो ठेवला आहे. याबाबत फ़ेसबुक लाईव्हमध्ये चर्चा झालीच. पोलीसांच्या कामगिरीचे अनेकांनी कौतुक केले.

पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांचे शिक्षण एमबीबीएस आहे. त्यामुळे एका नागरिकाने तुम्ही वेळ पडल्यास वैद्यकीय सेवा देणार का? असा प्रश्न केला त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे म्हणाले की, सध्या मी पोलीस अधीक्षकाची जबाबदारी पार पाडत आहे.गरज पडल्यास डॉक्टर म्हणून काम करेन पण तशी वेळ येणार नाही असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.डॉ.प्रवीण मुंढे यांनी 2003 ते 2009 याकाळात एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. 2008-09 याकाळात त्यांनी नवी मुंबईत इंटर्नशीप केली होती. त्यानंतर त्यांनी युपीएसी परीक्षा देत प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.

फेसबुक लाईव्ह मध्ये जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बघाटे सहभागी झाले होते. त्यांनीही जनतेच्या प्रश्नाला उत्तरे दिली. घाबरून जाऊ नका, घरीच रहा आणि सुरक्षित रहा असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या