रत्नागिरी: होळी नेताना जुना पूल कोसळून २० जखमी

40

सामना ऑनलाईन। रत्नागिरी

रत्नागिरीत कळंबुशीमध्ये सोमवारी सकाळी होळी नेताना ३५ वर्ष जुना पूल कोसळल्याने २० जण जखमी झाले आहेत. यातील ११ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

 

कळंबुशीमध्ये होळी साजरी करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आले होते. गावातील जुन्या  लाकडी पुलावरुन होळी नेत असताना सगळ्यांनी एकच गर्दी केली.  भार आल्याने  पूल कोसळला. नदीपात्र कोरडे असल्याने सगळेजण कोरड्या पात्रात पडले. यात २० जण जखमी झाले आहेत. पूल कोसळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या