साखरतर खाडीत होडी उलटून तिघांचा मृत्यू, 9 जण बचावले; लग्नासाठी आले होते नातेवाईक

साखरतर खाडीत होडीतून फिरत असताना भरतीच्यावेळी पाणी होडीत शिरुन होडी पलटी झाली. या दुर्घटनेत तीनजणांचा मृत्यू झाला आहे. वाचवलेल्या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून सहाजण सुखरुप आहेत. आज दुपारी ही दुर्घटना घडली.

साखरतर येथे लग्नासाठी मिरजहून आलेले 12 नातेवाईक आज एका होडीतून साखरतर खाडीतून फिरायला गेले होते. भरतीच्या वेळी होडीत पाणी शिरल्याने ही होडी पलटी झाली आणि हे सर्वजण पाण्यात बुडाले. राहिला नदीम बारगीर (वय 35), जबीन मोहम्मद हनिफ जमखंडीकर (वय 50), शायान यासीन शेख (वय 8) सर्व रा. मिरज या तिघांचा बुडून मृत्यू झाला. उर्वरित 9 जणांना वाचवण्यात यश आले.

वाचवलेल्या पैकी आहिल मिराज बारगीर (वय 2), शमशाद दिलावर गोलंदाज (वय 45) या दोघांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर मुबारक दिलावर गोलंदाज (वय 24), नदीम अहमद बारगीर (वय 40), यास्मीन दिलावर गोलंदाज (वय 25), सुलताना यासीन शेख (वय 28), रेहान यासीन शेख (वय 10), आजिया नदीम बारगीर (वय 9), अफसरा नदीम बारगीर (वय 11) हे सर्व सुखरुप आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या