पावसाचे पाणी साचल्याने चिरेखाणींचा धोका वाढला

366

रत्नागिरी जिल्हात मोठया प्रमाणात जांभ्या दगडाच्या चिरेखाणी आहेत. मात्र, या चिरेखाणींना बंदिस्त आवार नसल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. पावसाळयात साचणार्‍या पाण्यामुळे त्या भरत असल्याने त्यांचा धोका वाढत आहे. निवळी, हातखंबा, संगमेश्‍वर तसेच देवरुख भागात मोठया प्रमाणात अशा चिरेखाणी असून त्या बंदिस्त करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.

रत्नागिरी जिल्हात बांधकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिरेखाणी आहेत. उन्हाळयात दिवसरात्र या चिरेखाणीतून चिरे काढण्याचे काम केले जाते. तसेच महसूल विभागाकडून काही ठिकाणी चिरे काढण्यासाठी परवानगी दिली जाते. चिरे काढण्यासाठी मोठया प्रमाणात यंत्राचा उपयोग केला जातो. मात्र, चिरे काढल्यानंतर या चिरेखाणी बंदिस्त केल्या जात नसल्याने त्यांचा धोका वाढतो. रत्नागिरी जिल्हात उघडया चिरेखाणींमुळे अनेक दुघर्टना घडल्या आहेत. मात्र, अद्यापही चिरेखाणी बंदिस्त करण्यात आलेल्या नाहीत. पावसाळ्यात चिरेखाणीमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा धोका वाढला आहे.

जिल्हातील या चिरेखाणी बंदिस्त करून संभाव्य धोका कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. तसेच चिरेखाणी ज्या ठिकाणी आहेत त्याठिकाणी मोठया प्रमाणात भुस्स्खलन वाढले आहे. तसेच घरांना तडे जाणे, दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे चिरेखाणींना परवानगी देताना सर्व अटींचे काटेकोर पालन होईल, याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या