पर्यटन महोत्सव : मांडवी किनाऱ्यावर साकारली वाळूशिल्पे

39

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

पर्यटन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मांडवी समुद्रकिनारी स्थानिक कलाकारांनी वाळूशिल्पे रेखाटली आहेत. दर शनिवार-रविवारी मांडवी किनाऱ्यावर अशी वाळूशिल्पे उभारून पर्यटकांचे मनोरंजन करण्याचा उपक्रम मांडवी गावातील हे स्थानिक कलाकार हाती घेणार आहेत.

श्रीदेव भैरव नामसप्ताह सोहळ्याच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त मांडवी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मांडवी परिसरातील स्थानिक कलाकारांनी विविध वाळूशिल्पे रेखाटली आहेत. स्थानिक कलाकारांनी रेखाटलेली ही वाळूशिल्पे पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरणार आहेत. मांडवी पर्यटन संस्था दर शनिवार आणि रविवारी अशाप्रकारची वाळूशिल्पे किनाऱ्यावर रेखाटण्याचा उपक्रम पुढील काळात हाती घेणार आहेत. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नगर परिषदेने वाळूशिल्पांच्या या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाला सहकार्य करावे अशी मागणी मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या