रत्नागिरीत लसीकरण केंद्रावर धक्काबुक्की, चेंगराचेंगरी

रत्नागिरीतील मिस्त्री हायस्कूल येथील केंद्रावर लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने चेंगराचेंगरी झाली. लसीकरण केंद्रावरती प्रचंड गोंधळ उडाला. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

मेस्त्री हायस्कूलमध्ये आज सकाळपासून 18 ते 44 वयोगटासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून लसीकरण सुरू होते. दुपारच्या सत्रात 45 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार होता. या केंद्रावर 200 डोस उपल्बध होते मात्र दुसऱ्या डोससाठी पहाटेपासूनच नागरिकांनी नंबर लावले होते. दुपारच्या सत्रात ही गर्दी वाढली.

नागरिकांमध्ये वादावादी सुरू झाली. अखेर मेस्त्री हायस्कूलच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी, धक्काबुकी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत नागरिकांना आवरण्याचा प्रयत्न केला. 45 वर्षावरील नागरिक लसीकरणाचा दुसरा डोस मिळविण्यासाठी गर्दी करत आहेत. उपलब्ध लसीप्रमाणे लसीकरण केंद्रावर नियोजन करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या