
रत्नागिरी शहराच्या नळपाणी योजनेतील पाणी साठवण टाकी उभारण्यासाठी चार गुंठे जागा १ कोटी २७ लाख रूपये किंमतीने खरेदी करण्याचा ठराव आज रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुर केला. २१ विरूध्द ७ मतांनी मंजूर करण्यात आला. सातत्याने शिवसेनेनेवर टीका करणारी भाजपा तोंडावर आपटली. बहुमताच्या जोरावर शिवसेनेने हा ठराव मंजूर केला.
रत्नागिरी नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेसाठी रत्नागिरी शहरातील आलीमवाडी येथील.३.८८ गुंठे जागा खरेदी करण्याचा निणNय नगरपरिषदेने घेतला.या जमिनीचा दर नगररचाकार यांनी निश्चित केला.३.८८ गुंठ्यासाठी १ कोटी २७ लाख रूपयांचा दर निश्चित केला.त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने वाढीव दराला विरोध केला.त्यामुळे आजच्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.आजच्या सभेत पत्रकारांना प्रवेश देण्यात आला नाही.संविधान दिनीच पत्रकारांना सभेत प्रवेश न दिल्याने पत्रकार संघटनानी नाराजी व्यक्त केली.
आजच्या सभेत आलीमवाडीतील निश्चित केलेली जागा १ कोटी २७ लाख रूपयांना खरेदी करण्याच्या ठरावाला भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर ठरावासाठी मतदान घेण्यात आले.मतदानात सत्ताधारी शिवसेनेने हा ठराव बहुमताच्या जोरावर मंज़ूर केला.ठरावाच्या बाजूने २१ मते आणि ठरावाच्या विरोधात ७ मते पडली. आम्ही शहरवासियांना पाणी देण्यासाठी बांधिल आहोत.उद्या जर भाजप आलीमवाडीतील जागेसंदर्भात न्यायालयात गेले तर नळपाणी योजनेला विलंब होईल मग जनताच त्यांना उत्तर देईल असे साळवी यांनी सांगितले.
हा तर भाजपचा ढोंगीपणा
भाजपचे गटनेते समीर तिवरेकर यांनी आपण आलीमवाडीतील ज़मीन खरेदी प्रकरणात न्यायालयात जाऊन दाद मागणार आहोत. आम्ही साठवण टाकीसाठी पर्यायी जागा निवडली असल्याचे सांगितले. त्याबाबत पत्रकारांशी बोलताना नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी पर्यायी जागा हा भाजपाचा ढोंगीपणा असल्याचा आरोप केला. महिनाभरात प्रसारमाध्यमात हे प्रकरण गाजत असताना तेव्हा तुम्हाला पर्यायी जागा का सुचली नाही. सभेच्या दिवशी तुम्ही जागा सुचवून काय साध्य होणार असा सवाल साळवी यांनी उपस्थित केला.